नवोदय ऑनलाईन टेस्ट 4

   नवोदय ऑनलाईन टेस्ट 4

        विषय : मराठी  

Navodaya अभ्यास





        

   


      अजितचा वाढदिवस होता. त्याचे सर्व मित्र आणि नातेवाईक जमले होते. त्याला अनेक भेटी मिळाल्या. पुस्तके, खेळणी आणि कपडे. अजितच्या आत्याने त्याला एक नवलाईची भेट दिली. एक गुलाबाचे रोप. अजितला सगळ्यात आत्याची भेट आवडली. तो लगेच बागेत पळाला आणि त्याने ते रोप लावून टाकले. त्या रोपाला अजितने रोज पाणी घातले. सकाळी उठल्याबरोबर तो ते रोप किती वाढले ते जाऊन पाहू लागला. एके दिवशी त्याला गुलाबाच्या दोन कळ्या डोकावताना दिसल्या. हो निरीक्षण करीत राहिला. त्या कळ्या उमलल्या आणि त्याचे सुंदर पिवळे गुलाब झाले. त्याला आनंद झाला आणि तो उत्तेजित झाला. आईच्या मदतीने त्याने ती फुले खुडली. त्याने पहिले दोन गुलाब आईला आणि बहिणीला भेट दिले. अजितने आपल्या बागेत आणखी रोपे रोवण्याचे ठरवले.

1. अजितच्या वाढदिवसाची सर्वोत्कृष्ट भेट होती -

(A) शर्यतीची मोटार

(B) सदरा

(C) गुलाबाचे रोप

(D) पुस्तक.

2. उठल्याबरोबर अजित -

(A) अभ्यासाला बसला

(B) रोप पाहायला पळाला

(C) अंघोळीला गेला

(D) शाळेत गेला.

3. प्रथम किती कळ्या आल्या?

(A) एक

(B) चार

(C) दोन

(D) अनेक.

4. अजितने पहिले दोन गुलाब भेट दिले -

(A) आपल्या मित्रांना

(C) त्याच्या आईला आणि बहिणीला

(B) आत्याला

(D) त्याच्या आईला आणि आत्याला.

5. उत्तेजित याचा अर्थ आहे-

(A) दुःखी

(B) भावुक

(C) भयग्रस्त

(D) आश्चर्यचकित



📌   चाचणी  सोडवा 📌




Comments

Popular posts from this blog

JNVST Preparation Tips for 2025

नवोदय ऑनलाईन टेस्ट 5

Exam Day Tips and Strategies for JNVST