Posts

Showing posts with the label भाषा ऑनलाईन टेस्ट

नवोदय ऑनलाईन टेस्ट 7 Navodaya Online Test 7

Image
 नवोदय ऑनलाईन टेस्ट 7 Navodaya Online Test 7    पुढील प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा. प्रत्येक उताऱ्याखाली पाच प्रश्न दिले आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी (A), (B), (C) व (D) अशी चार संभाव्य उत्तरे दिली आहेत. यांपैकी योग्य उत्तराची निवड करा आणि योग्य उत्तराच्या पर्यायाचे वर्तुळ काळे करा :             आपण जेथे पाहू तेथे परमेश्वरच आहे. परंतु आपण आंधळे आहोत. आपण झाडामाडांतच देव पाहतो. परंतु मानवातील देव आपणांस दिसत नाही. आपणांस तीन तोंडांचा, आठ हातांचा असा देव पाहिजे असतो. मनुष्याहून काही निराळा देव आपणांस हवा असतो. मनुष्याच्या रूपाने आपल्याशेजारी उभा असलेला परमेश्वर आपणांस दिसत नाही. या मानवाजवळ आपण भांडतो. त्याला आपण गुलाम करतो. त्याची कत्तल करतो आणि देवाची पूजा करू पाहतो. भगवंतांना याचे आश्चर्य वाटते. अरे, मनुष्यातील देव आधी पाहा. हा बोलता चालता देव आहे, याचे स्वरूप बघा, याला काय हवे नको ते पाहा. दगडाच्या देवाला काय आवडते, हेही आपण ठरवून टाकले आहे. गणपतीला मोदक आवडतो, विठोबाला लोणी आवडते. खंडोबाला खोबरे हवे, परंतु मानवाला काय हवे याची विवंचना आपण...

नवोदय ऑनलाईन टेस्ट 5

Image
  नवोदय ऑनलाईन टेस्ट 5                  विषय : भाषा               जनतारूपी जनार्दनाची जो मनोभावे सेवा करतो, तोच ईश्वराला प्रिय होतो. आज या जगात अशी लक्षावधी माणसे आहेत की, त्यांना तुमच्या-आमच्या मदतीची गरज आहे. कुणी किरकोळ आजारी, कुणी रोगी, कुणी लुळे तर कुणी पांगळे ! बांधली, बहिरी, मुकी, मागासलेली अनाथ पोरं । समाजात अशांना कुणी जवळ करीत नाही. पण त्यांना विजय मर्चेंट यांनी जवळ करून प्रचंड कार्य केले. या लोकांना विजय मर्चट देव वाटत होते; पण विजय मर्चेंट यांनी या जनतेलाच देव मानले. अशा असहाय समाजाची सेवा करणे, त्यांना मदत करणे, त्यांच्या उदास जीवनात उत्साह उत्पन्न करणे, एवढेच नव्हे, तर त्यांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे हेच खरे महत्त्वाचे कार्य आहे. त्यांना कोरडी सहानुभूती नको, त्यांच्या उ‌द्घाराची आच नको; तर त्यांना जवळ करणारा सतत प्रोत्साहन देणारा बंधुभाव हवा. 1. ईश्वराला कोण प्रिय होतो? (A) स्वतःवर प्रेम करणारा (B) अपंग असणारा (C) सतत प्रोत्साहन देणारा (D) लोकांची सेवा करणारा. 2. समाजसेवकाचे महत्त...

नवोदय ऑनलाईन टेस्ट 4

Image
   नवोदय ऑनलाईन टेस्ट 4         विषय : मराठी                      अजितचा वाढदिवस होता. त्याचे सर्व मित्र आणि नातेवाईक जमले होते. त्याला अनेक भेटी मिळाल्या. पुस्तके, खेळणी आणि कपडे. अजितच्या आत्याने त्याला एक नवलाईची भेट दिली. एक गुलाबाचे रोप. अजितला सगळ्यात आत्याची भेट आवडली. तो लगेच बागेत पळाला आणि त्याने ते रोप लावून टाकले. त्या रोपाला अजितने रोज पाणी घातले. सकाळी उठल्याबरोबर तो ते रोप किती वाढले ते जाऊन पाहू लागला. एके दिवशी त्याला गुलाबाच्या दोन कळ्या डोकावताना दिसल्या. हो निरीक्षण करीत राहिला. त्या कळ्या उमलल्या आणि त्याचे सुंदर पिवळे गुलाब झाले. त्याला आनंद झाला आणि तो उत्तेजित झाला. आईच्या मदतीने त्याने ती फुले खुडली. त्याने पहिले दोन गुलाब आईला आणि बहिणीला भेट दिले. अजितने आपल्या बागेत आणखी रोपे रोवण्याचे ठरवले. 1. अजितच्या वाढदिवसाची सर्वोत्कृष्ट भेट होती - (A) शर्यतीची मोटार (B) सदरा (C) गुलाबाचे रोप (D) पुस्तक. 2. उठल्याबरोबर अजित - (A) अभ्यासाला बसला (B) रोप पाहायला पळाला (C) अंघोळीला ग...

नवोदय ऑनलाईन टेस्ट 3

Image
 नवोदय ऑनलाईन टेस्ट 3             विषय : भाषा  उतारा-3 (2017) पुढील प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा. प्रत्येक उताऱ्याखाली पाच प्रश्न दिले आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी (A), (B), (C) व (D) अशी चार संभाव्य उत्तरे दिली आहेत. यांपैकी योग्य उत्तराची निवड करा आणि योग्य उत्तराच्या पर्यायाचे वर्तुळ काळे करा :         तपकिरी अस्वल हा एक सर्वभक्षी प्राणी आहे. याचा अर्थ असा की ते वनस्पती आणि प्राणी दोन्ही खाते. अस्वलाना आपल्या निवासक्षेत्रामधील मुख्य प्रबळ प्राणों असल्यामुळे ते मोठ्या प्राण्यांचीदेखोल शिकार करू शकते, तरीपण सर्वसामान्यपणे ते केवळ छोट्या प्राण्यांना खाते. तपकिरी अस्वलाने कुठल्याही प्रकारचे अन्न भक्षण केले, तरी या प्राण्याचे मोठाले पोट भरण्यासाठी अन्नाचे प्रमाण प्रचंड लागते. बऱ्याचदा अन्न थोड्या-थोड्या प्रमाणातच प्राप्त होते. म्हणून अन्नाचा शोध को संपतच नाही. वसंत ऋतूमध्ये तपकिरी अस्वले गवत, पाने, मुळे (वनस्पती) आणि शेवाळ खातात. बऱ्याचदा तो मुंग्या, भुंगे, रातकिडे आणि इतर कीटकांच्या शोधात छोटे दगड आणि मोठाले खडकदेखील उलटून टाकत...

नवोदय ऑनलाईन टेस्ट 2

Image
 नवोदय ऑनलाईन टेस्ट 2                विषय : भाषा                       मराठी माध्यम             उतारा - 3 (2018)         खेड्यातल्या बाजारच्या दिवसाची मजा मुले, स्त्रिया, पुरुष सगळे लुटतात. शेतकऱ्यांना आपला भाजीपाला आणि धान्य आणि आपल्या शेतात पिकवलेल्या सगळ्या वस्तू विकायची ती चांगली जागा असते. सकाळी-सकाळी शेतकरी धान्याची पोतो आणि फळांच्या व भाजीपाल्याच्या टोपल्या यांनी आपल्या बैलगाड्या आणि ट्रॅक्टर भरून टाकतात. बाजारात विकायच्या असलेल्या शेळ्यामेंढ्या, गाई-म्हशी आणि कोंबड्याही बरोबर घेतात. त्यांना बाजारातून वस्तू विकतही घ्यायच्या असतात. त्यांना कपडे आणि मसाले, तसेच कितीतरी घरगुती जिन्नस हवे असतात. त्यांच्या शेताजवळ या गोष्टी सहज उपलब्ध नसतात.         बांगडीविक्रेत्याकडून बायका रंगीत बांगड्या खरेदी करतात. शेकोट्या पेटवल्या जातात. भजी, पुऱ्या आणि भाज्या बनवल्या जातात. समोसे आणि उसाचा रसही फार लोकप्रिय असतो. मु...

नवोदय ऑनलाईन टेस्ट 1

Image
 नवोदय ऑनलाईन टेस्ट                 1               विषय भाषा  पुढील प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा. प्रत्येक उताऱ्याखाली पाच प्रश्न दिले आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी (A), (B), (C) व (D) अशी चार संभाव्य उत्तरे दिली आहेत. यांपैकी योग्य उत्तराची निवड करा आणि योग्य उत्तराच्या पर्यायाचे वर्तुळ काळे करा :                            उतारा - 1            फुटबॉल हा जगामधील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे आणि तो जगातील प्रत्येक देशात खेळला जातो. फुटबॉलचे नियम ब्रिटनमध्ये 1860 मध्ये बनवले गेले. या खेळाचे नियंत्रण करण्याकरिता तेव्हा 'दि फुटबॉल असोसिएशन' तयार झाली. हा खरोखर एक सरळ साधा खेळ आहे. यामध्ये ।। खेळाडूंचे दोन संघ आपल्या विरुद्ध संघाच्या गोलमध्ये चेंडू घालण्याचा प्रयत्न करतात.       खेळाडू आपल्या पायांनी अथवा डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात, पण त्यांना चेंडूला हाताने अथवा बाहूने ...