नवोदय ऑनलाईन टेस्ट 1
नवोदय ऑनलाईन टेस्ट 1
विषय भाषा
पुढील प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा. प्रत्येक उताऱ्याखाली पाच प्रश्न दिले आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी (A), (B), (C) व (D) अशी चार संभाव्य उत्तरे दिली आहेत. यांपैकी योग्य उत्तराची निवड करा आणि योग्य उत्तराच्या पर्यायाचे वर्तुळ काळे करा :
उतारा - 1
फुटबॉल हा जगामधील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे आणि तो जगातील प्रत्येक देशात खेळला जातो. फुटबॉलचे नियम ब्रिटनमध्ये 1860 मध्ये बनवले गेले. या खेळाचे नियंत्रण करण्याकरिता तेव्हा 'दि फुटबॉल असोसिएशन' तयार झाली. हा खरोखर एक सरळ साधा खेळ आहे. यामध्ये ।। खेळाडूंचे दोन संघ आपल्या विरुद्ध संघाच्या गोलमध्ये चेंडू घालण्याचा प्रयत्न करतात.
खेळाडू आपल्या पायांनी अथवा डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात, पण त्यांना चेंडूला हाताने अथवा बाहूने स्पर्श करण्याची अनुमती नसते. केवळ गोली तेवढा चेंडूला हात लावू शकतो आणि तेसुद्धा केवळ आपल्या गोलसमोरील पेनल्टीच्या क्षेत्रामध्येच.
1. फुटबॉलचे नियम बनवले गेले -
(A) प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी
(C) त्याला सोपे करण्यासाठी
(B) खेळाचे नियंत्रण करण्यासाठी
(D) तो लोकप्रिय करण्यासाठी.
2. फुटबॉल खेळला जातो दोन संघांमध्ये -
(A) प्रत्येकी नऊ खेळाडूंच्या
(C) प्रत्येकी अकरा खेळाडूंच्या
(B) प्रत्येकी दहा खेळाडूंच्या
(D) प्रत्येकी बारा खेळाडूंच्या.
3. खेळाडू चेंडूचे नियंत्रण करतात
(A) पायांनी
(B) हातांनी आणि पायांनी
(C) डोक्याने आणि पायांनी
(D) मित्र आणि प्रेक्षक यांच्यासह.
4. गोली आपल्या हाताने चेंडूला स्पर्श करू शकतो -
(A) मैदानात कोठेही
(B) रेफ्रीसमोर
(C) पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर
(D) पेनल्टी क्षेत्राच्या आत.
5. जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे
(A) व्हॉलीबॉल
(B) क्रिकेट
(C) बुद्धिबळ
वरील उतारा वाचून खालील चाचणी सोडवा.
(D) फुटबॉल.
Good
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete