नवोदय ऑनलाईन टेस्ट 7 Navodaya Online Test 7

 नवोदय ऑनलाईन टेस्ट 7

Navodaya Online Test 7 

Navodaya Online Test 7

  पुढील प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा. प्रत्येक उताऱ्याखाली पाच प्रश्न दिले आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी (A), (B), (C) व (D) अशी चार संभाव्य उत्तरे दिली आहेत. यांपैकी योग्य उत्तराची निवड करा आणि योग्य उत्तराच्या पर्यायाचे वर्तुळ काळे करा :

 



         आपण जेथे पाहू तेथे परमेश्वरच आहे. परंतु आपण आंधळे आहोत. आपण झाडामाडांतच देव पाहतो. परंतु मानवातील देव आपणांस दिसत नाही. आपणांस तीन तोंडांचा, आठ हातांचा असा देव पाहिजे असतो. मनुष्याहून काही निराळा देव आपणांस हवा असतो. मनुष्याच्या रूपाने आपल्याशेजारी उभा असलेला परमेश्वर आपणांस दिसत नाही. या मानवाजवळ आपण भांडतो. त्याला आपण गुलाम करतो. त्याची कत्तल करतो आणि देवाची पूजा करू पाहतो. भगवंतांना याचे आश्चर्य वाटते. अरे, मनुष्यातील देव आधी पाहा. हा बोलता चालता देव आहे, याचे स्वरूप बघा, याला काय हवे नको ते पाहा. दगडाच्या देवाला काय आवडते, हेही आपण ठरवून टाकले आहे. गणपतीला मोदक आवडतो, विठोबाला लोणी आवडते. खंडोबाला खोबरे हवे, परंतु मानवाला काय हवे याची विवंचना आपण कधी करतो काय? आपल्या सभोवती हा दोन हातांचा देव उभा आहे. त्याच्या पोटात अन्न नाही, त्याच्या अंगावर वस्त्र नाही, त्याच्या पूजेला येतो का धावून?


1. या उताऱ्यात कोणाला देव म्हटले आहे?

(A) मनुष्य (B) खंडोबा (C) गणपती (D) विठोबा.


2. मनुष्यातील देव आधी पाहा असे कोण म्हणते ? 

A) मानव (B) भगवंत (C) आंधळे (D) झाडमाड.


3. आपण कसली काळजी करीत नाही ?


(A) अंगावर वस्त्र नाही याची


(B) पोटात अन्न नाही याची


(C) मानवाला काय हवे याची


(D) आपण माणसाला गुलाम करतो याची.


4. खंडोबाला काय हवे असते?


(A) खोबरे (B) मोदक (C) लोणी (D) अन्न.


5. मनुष्य हा कशा प्रकारचा देव आहे?

(A) गुलाम

(B) आठ हातांचा

(C) तीन तोंडांचा

(D) चालता-बोलता.

👉  Test  सोडवा




Comments

Popular posts from this blog

नवोदय ऑनलाईन टेस्ट 4

नवोदय ऑनलाईन टेस्ट 5

JNVST Preparation Tips for 2025

नवोदय ऑनलाईन टेस्ट 3

Exam Day Tips and Strategies for JNVST