नवोदय भाषा उतारा 1

नवोदय भाषा उतारा 1

      उतारा - 1


    सिमी म्हणजे एक पिल्लू होते. ती फार गोड होती. आशाला ती एका पार्कमध्ये रडत असलेली सापडली होती. तिने उचलून घेतले, तेव्हा पिल्लू रडायचे थांबले आणि तिच्याकडे पाहू लागले. आशाला तिचे असे बघणे आवडले तिने तिला घरी घेऊन जायचे ठरवले. तिच्या आईनेही या बेताला संमती दिली. त्या दोघांनी तिचे नाव ठेवले 'सिमी' तिला त्या आनंदाने घरी घेऊन आल्या.

       अजून त्या पिल्लाला कोणी शिकवलेले नव्हते, म्हणून आशाने विचार केला की त्याला शिकवावे. दुसऱ्या सकाळी ती सिमीला बाहेर घेऊन गेली आणि तिला काही गोष्टी शिकवल्या. शिकवणाऱ्याला थोडे कठोर व्हावेच लागते. जेव्हा तिने ऐकले नाही, तेव्हा आशाने तिला शिक्षा केली आणि जेव्हा तिने मनाप्रमाणे करून दाखवले, तेव्हा तिला दिले. एकंदरीत शिकवणे काही अवघड नव्हते. एका आठवड्याच्या आत सिमी म्हणजे एक चांगले सभ्य पिल्लू बनून 

1. आशा सिमीला घरी घेऊन आली; कारण तिला

(A) तिची दया आली.

(B) तिचे बघणे आवडले.

(C) कुत्र्याची आवड होती.

(D) एका पिल्लाची गरज होती.


2. 'तिने ऐकले नाही.......' इथे 'तिने' म्हणजे-

(A) आशाने

(B) आशाच्या आईने

(C) पिल्लाने

(D) गोष्ट सांगणारीने.

3. 'बक्षीस' च्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?

(A) प्रोत्साहन

(B) शिक्षा

(C) भेट

(D) रागावणे.

4. पिल्लाचे नाव 'सिमी' कोणी ठेवले?

(A) आशाने

(B) तिच्या आईने

(C) आशाने आणि तिच्या आईने

(D) आशाच्या मैत्रिणीने.

5. 'मनाप्रमाणे करून दाखवले...' याकरिता पुढीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे?

(A) आज्ञापालन

(B) प्रदर्शन

(C) अनुकरण

 (D) उचलणे.


Comments

Post a Comment

Thank you for you answers...

Popular posts from this blog

नवोदय ऑनलाईन टेस्ट 4

JNVST Preparation Tips for 2025

नवोदय ऑनलाईन टेस्ट 5

Exam Day Tips and Strategies for JNVST